पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम.

पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम.

---------------------------------------------------------------------------------
    
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) ; एच .एस. सी बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या निकालात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने कला विज्ञान वाणिज्य वोकेशनल विभागात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९७.४१% इतका लागला आहे.

इयत्ता बारावी वाणिज्य विभागातील अंभोरे साईनाथ अभय आयाचित अमेय जयंत हराळे प्रणव प्रदीप नलवडे तनवी संजय पाटील गायत्री या विद्यार्थ्यांनी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात शंभर पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे विज्ञान विभागात प्रथम क्रमांक सावळकर यश शीतलकुमार, द्वितीय क्रमांक उत्पात श्रद्धा रामचंद्र, तृतीय क्रमांक खडके सुहासिनी संजीवकुमार. कला विभागाचा शेकडा निकाल ९१.७० टक्के लागला आहे कला विभागात प्रथम क्रमांक सूर्यवंशी सोनाली संजय द्वितीय क्रमांक मुळे अमृता विजयकुमार तृतीय क्रमांक आप्रे आकांक्षा गोरखनाथ वाणिज्य विभागाचा शेकडा निकाल ९९.४६ टक्के लागला आहे वाणिज्य विभागात प्रथम आयाचित आम्ही जयंत द्वितीय क्रमांक- कोहळे सायली रवींद्र, तृतीय क्रमांक- रोंगे नीलम सुरेश, व्होकेशनल विभागाचा शेकडा निकाल ९८.११ टक्के लागला आहे. व्होकेशनल विभागात सर्वप्रथम सगर जोहिता राजेंद्र, द्वितीय क्रमांक- सगर आणि हा विजय, तृतीय क्रमांक- मिसाळ कल्याण

वरील विद्यार्थ्यांनी आपापल्या शाखेमध्ये प्रथम,  द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी अभिनंदन केले व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जुने विभागाचे उपप्राचार्य प्रा.बी .आर शिंदे पर्यवेक्षक प्रा. युवराज अवताडे प्रा. आरएस मुसळे . पी .एम भोसले कार्यालयीन प्रमुख पारधी सर शिवाजीराव लोभे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.