पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट

पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट

------------------------------------------------------------------------------------

 पुणे ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्याने घरातील खिडकीला गळाफास लावून आत्महत्या केलीय. स्वारगेट येथील पोलीस लाईनमधील घरातच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांना खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, त्यांचा मोबाईल सापडला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

स्वरूप जाधव असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुळचे कोल्हापूर येथील रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील पोलीस मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. ते स्वारगेट परिसरातील पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीला टॉवेल बांधला. तसेच टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, त्यांनी संशयास्पद कोणतीही गोष्ट आढळली नाही. सुसाईड नोट देखील सापडली नाही. मात्र, पोलिसांना स्वरूप जाधव यांचा मोबाईल सापडला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन जप्त केला आहे. मात्र तो लॉक असल्यामुळे आतापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, स्वरूप जाधव यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, जाधव यांनी अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.