पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित ,पंचरत्न इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत, विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ,पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्येदि.15 शनिवार प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यां व विद्यार्थीथिनी चे स्वागत पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यावर मोठ्या उत्साहाने पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मिलिंद जोशी , एस .पी कुलकर्णी सर ,द.ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम कुलकर्णी सर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहोळकर मँडम व सर्व शिक्षक स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले.

विद्यार्थी अतिशय आनंदी दिसत होते. प्रशालेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले खरच विद्यार्थ्यांशिवाय शाळाच होऊ शकत नाही. या प्रसंगी प्री प्रायमरी सेक्शन च्या छोट्या विद्यार्थी चिमुकल्यांचेही सर्व शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले तसेच प्रशाले तर्फे त्यांना खाऊ वाटप करण्यात आला . पालकांच्या काळजाचा तुकडा त्यांनी आज प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खाऊ प्रशालेमध्ये वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जबाबदारी आज प्रशालेतील शिक्षकांनी घेतली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली शिंदे मँडम, क्षितिज मोहोळकर, मिनाक्षी गायकवाड़, शिल्पा कुलकर्णी, सायली पोरे, श्रद्धा दुरुगकर, निशा जाधव, कविता जगताप, रोहिणी काळे, कल्पना हुच्चे, मुग्धा चौबे, प्रविण उत्पात,निखिल घोडके यांनी सहकार्य केले.