भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या..
---------------------------------------------------------------------------------
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात बनला चर्चेचा विषय
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (रा .जवळा )यांनी २७ फेब्रुवारीपर्यंत निर्मला यादव यांना नांदायला घरी घेऊन नाही गेले तर निर्मला यादव स्वतः च आयुष्य संपवणार आहे. अशी माहिती निर्मला यादव यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे. यामध्ये त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत. त्यांच्या मरणाला रणजीत निंबाळकर आणि चंद्रकांत पाटील आणि श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशीकांत देशमुख आणि श्रीकांत ची पहिली बायको माझ्या मरणाला जिम्मेदार असतील. असे सांगितले आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत ची मुदत का दिली? पहा निर्मला यादव यांनी शेअर केलेली पोस्ट.
आमची कुलस्वामिनी तुळजापुर भवानी मातेच्या साक्षीने आमचे लग्न पुण्या मध्ये दोन पंडितांच्या साक्षीने झाले आहे, आणि त्या पंडितांनी सोलापूर पोलिसांना जबाब लिहून दिला आहे की श्रीकांत चे आणि माझे लग्न स्वाता त्या पंडितांनी लावुन दिले आहे. मी सुहासिनी सारखीच मरणार.. माझ्या सुहासिनी लेण्याच्या समोर कोणतीच ताकद मी मानत नाही , या येत्या २७ फेब्रुवारी ला आमच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होत आहे, जर माझ्या नवऱ्याने स्वता येऊन या २७ फेब्रुवारीपर्यंत जर मला घरी नांदायला घेऊन नाही गेले तर मी स्वतः माझे आयुष्य संपवणार आहे , मी एक सुहासिंन आहे माझा अपमान करणारे रणजीत निंबाळकर आणि चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीकांत देशमुख यांचा मोठा भाऊ शशीकांत देशमुख आणि श्रीकांत ची पहिली बायको माझ्या मरणाला जिम्मेदार असतील. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून ते पुरते या प्रकरणामुळे हैराण झाले आहेत.