तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या भ्रष्टकारभार विरोधात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उग्र आंदोलन सुरू..

तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या भ्रष्टकारभार विरोधात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उग्र आंदोलन सुरू..

----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर तालुक्यातील खडी क्रेशर मालकांशी अर्थपूर्ण मैत्री करून खडी क्रेशर चालू केल्याचा दादासाहेब चव्हाण यांचा आरोप
----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर व सांगोला तालुक्याचे तहसिलदार अभिजीत पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दादा चव्हाण यांनी बेमुदत हालगीनाद आंदोलन सुरू केले आहे ,सांगोला व पंढरपूर तालुक्यातील  बंद असलेले बेकायदेशीर खडी क्रशर महसूल प्रशासनाने सीलबंद केले होते परंतु पंढरपूर सुशील बेलेकर व सांगोला तहसीलदार अभिजीत पाटील यांनी खडी क्रशर मालकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून पुन्हा ते बेकायदेशीर खडी क्रशर चालू केले असल्याने व बेकायदेशीर खडी क्रशर चालवले जात आहेत ते अवैद्य खडी क्रशर तात्काळ बंद करण्यात यावेत व त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून बेकायदेशीर खडी क्रशर चालवले जात असतानाही आंदोलकांना खोटी लेखी पत्र देऊन पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेलेकर व सांगोला तहसीलदार अभिजीत पाटील हे आंदोलकांची फसवणूक करत असल्याचे माहीती दादा चव्हाण यांनी दिली आहे.

पंढरपूर शहर व तालुक्यात भीमा नदीच्या व मान नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणात महसूलच्या रावसाहेब भाऊसाहेब यांच्या सहकार्याने वाळू चोरी होत असल्याचा आरोप समाजसेवक दादा चव्हाण यांनी केला आहे .त्यामुळे पंढरपुर  तहसीलदार यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे तहसीलदार बेलेकर यांच्या चौकशी  अंती वाढ होण्याची शक्यता असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.