गोपाळपूर येथे दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी पळवण्याचे शर्यतीचे आयोजन
------------------------------------------------------------------
पंढरपूर प्रतिनिधी : गोपाळपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त प्रत्येक वर्षी साजरा होणाऱ्या म्हशी पळवणे शर्यतीचे उद्घाटन पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आली .शेतकरी बांधवांनी आपल्या जिवापेक्षा जास्त लहान बाळासारखी जपलेल्या म्हैस -गाय- बैल या जनावरांकरिता एक आगळा- वेगळा उपक्रम म्हणून ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना उत्साहित करण्यासाठी म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यानंतर विजेत्या स्पर्धकांना आमदार समाधान आवताडे यांचे शुभ हस्ते बक्षिसे घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच विलास मस्के उपसरपंच विक्रम आसबे. माजी सरपंच शिवाजीराव आसबे .पंढरपूरचे नगरसेवक वामन बनपट्टे. महेश दादा चव्हाण .संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य उदय पवार किरण पवार. ग्रामपंचायत सदस्य राहुल माने .सतीश लेंगरे. योगेश कांबळे. इ.ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.