श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगामाचा उद्या. १६ रोजी शुभारंभ

श्री विठ्ठल सहकारी साखर  कारखान्याचा ४१ वा गळीत हंगामाचा उद्या. १६ रोजी शुभारंभ

----------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( प्रतिनिधी) गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि .वेणूनगर या कारखान्याचा ४१ वा गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दिनांक १६/१०/२०२२रोजी सकाळी११  वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार प्रवीण जी दरेकर तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. साखर आयुक्त शेखर गायकवाड. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते गळीताचा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर करण्यात येणार आहे .

तरी या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकरी वाहन मालक व सभासद बंधूनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व्हाईस चेअरमन प्रेम लता रोंगे यांनी केले आहे.