बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

-------------------------------------------------------------------------------------

बार्शी( दै पंढरी नगरी न्युज ) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन ७ नोव्हेंबर २०२२ रोजी  शिवशक्ती मैदानावर करण्यात आले. ही स्पर्धा दहा हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकारात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी. पाटील यांनी केले.

यावेळी संस्थेचे खजिनदार मा. श्री जयकुमार शितोळे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एस गोरे, प्राचार्य डॉ. भारती रेवडकर, प्राचार्य डॉ. शशिकांत गाढवे, स्पर्धा सचिव प्रा. डॉ. एस एम लांडगे, डॉ.ए जी कांबळे, विद्यापीठ निवड समिती चेअरमन डॉ. किरण चोकाककर, डॉ. अशोक पाटील,डॉ. समर्थ मनुकर, सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड,आयक्यूएसी समन्वयक डॉ.व्ही पी शिखरे उपस्थित होते.

*यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या स्पर्धेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. सातत्याने सराव केल्यास क्रीडा स्पर्धेत यश नक्की मिळते असे त्यांनी सांगितले. संस्थेचे खजिनदार मा. श्री. जयकुमार शितोळे यांनी  सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेतूनच विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक गुणांचा विकास होतो. यातून एक चांगले व्यक्तिमत्व तयार होते असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास घडविण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत.अशा प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. यातूनच उद्याचे नवोदित खेळाडू तयार केले जातात असे त्यांनी सांगितले.

या मैदानी क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद डीबीएफ दयानंद कॉलेज सोलापूर यांनी पटकावले. तसेच वैयक्तिक विजेतेपद दयानंद कॉलेज सोलापूर येथील रितेश इतापे तर संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथील संतोषी देशमुख यांना प्राप्त झाले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे, स्पर्धा सचिव प्रा. डॉ. एस एम लांडगे, पंच म्हणून विविध शारीरिक शिक्षण संचालक तसेच  क्रीडा मार्गदर्शक,  बी पी एड व एम पी एड प्रशिक्षणार्थी यांनी योगदान दिले.

प्रास्ताविक डॉ.ए जी कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस एस सुरवसे यांनी केले.