बार्शी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु .तेजस्विनी झिंजे कुस्ती स्पर्धेत प्रथम

बार्शी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु .तेजस्विनी झिंजे कुस्ती स्पर्धेत प्रथम

____________________________________________________

बार्शी( दै. पंढरी नगरी न्यूज) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन फ्री स्टाईल महिला  कुस्ती स्पर्धेचे आयोजन शनिवार दि.१२.११.२०२२रोजी के.एन.भिसे महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे करण्यात आले होते. सदर महिला कुस्ती स्पर्धेत शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी च्या विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले. बी.पी.एड.भाग 2 मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु.तेजस्विनी झिंजे हिने ५० किलो वजन गटात प्रथम क्रमांक, तसेच कु. शेख करीना हिने ६८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या उज्वल यशाबद्दल शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव,जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील,सहसचिव अरुण देबडवार व खजिनदार बापुसाहेब शितोळे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.