श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज ) बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे भारताचे महामानव भारतरत्न,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी यांच्या शुभ हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे क्लार्क विराज पतंगे यांनी केले.या वेळी वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ,तसेच वाचक वर्गामध्ये अनिल मुसळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे विचार आणि त्यांच्या बद्दल चांगली माहिती करून दिली.
यावेळी वाचक वर्ग व सभासद, अनिल मुसळे, बी.एम.जाधव, एस.टी.लादे, भारत गोणेकर, सलीम शेख, रविंद्र घाटले, विश्वास पाटील, चंद्रशेखर घेवाडे, मधुकर गोणेगावकर, अर्ल्बट वग्गर हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाचे महिला कर्मचारी तौर ह्या पण उपस्थित होत्या.