बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात जिजाऊ जयंती उत्साहाने साजरी...

बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात जिजाऊ जयंती उत्साहाने साजरी...

-----------------------------------------------------------------------------------

बार्शी ,(पंढरी नगरी न्यूज ) बार्शी शहर येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय,बार्शी येथे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपतींच्या अर्थात शिवाजीराजे यांच्या मनावर बिंबवणाऱ्या,स्वराज्यसंकल्पिका, स्वराज्यप्रेरीका,मार्गदर्शिका राष्ट्रमाता,राजमाता,माँसाहेब जिजाऊ यांची ४२६ वी आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची ४२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांतजी ठोकळ , प्रमुख पाहुणे इंजि. हेमंतदादा जाधव, सेवानिवृत्त फूड इन्स्पेक्टर भागवत बोबडे , सामाजिक कार्यकर्ते सुहासबप्पा सुतार, उत्तमराव देशमुखे, चंद्रकांतबापू वडेकर, सतीश पाचकुडवे,सोमनाथ गायकवाड व ग्रंथपाल विनोद गायकवाड तसेच सभासद, वाचक आदी उपस्थित होते.