बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात कवी कुसुमाग्रज तथा वि. वा .शिरवाडकर यांची जयंती मराठी दिन म्हणून उत्साहात साजरा
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा पद्मभूषण वि.वा.उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्याने "मराठी राजभाषा गौरव दिन" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी कर्मवीर ग्रंथालयाचे उपाध्यक्ष धैयशील देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र सुनिल फल्ले हे होते.मराठी राजभाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने मराठी भाषेचे महत्व आपल्या मनोगतात प्रमुख मान्यवरांनी विषद केले.यावेळी जेष्ठ सभासद अनिल धाट,सुरेश शिंदे,प्रेम अग्रवाल,राहुल लोंढे यांचेसह बालवाचक आर्यन पोकळे, मंथन घावटे, अक्षय पोकळे, शौनक अग्रवाल यांचेसह वाचक व सभासद उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.