भाळवणी माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियान कार्यक्रमाचे आयोजन..
-----------------------------------------------------------------------------------
भाळवणी (प्रतिनिधी)/- पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात नवरात्र महोत्सव निमित्त व आरोग्य सेवा प्रगत व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रम अभियानाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा युवा सेनेचे संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर सांगोला तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवान चौगुले .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे सरपंच राजकुमार पाटील. उपसरपंच सविता लोखंडे .ह भ प तात्या महाराज चौगुले .उद्योजक विजय शिंदे .माजी उपसरपंच सुनील पाटील. रणजीत जाधव. पत्रकार नितीन शिंदे .जिगर गायकवाड सचिन कुचेकर .लोकमान्य इनामदार. भोजलिंग बाबर .निहार शेख .अमोल लिंगे .नामदेव माने .पत्रकार प्रशांत माळवदे .आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रेपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शिवाजी बाबर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत .सांगोला चे आमदार शहाजी बापू पाटील .जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत सर व उप जिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माता सुरक्षित व घर सुरक्षित हे अभियान राबविण्यात आले आहे तसेच अभियानातील अनेक रुग्णांच्या रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या .या अभियाना अंतर्गत महिलांच्या विविध प्रकारच्या आजारासंबंधी योजना ची माहिती सांगण्यात आली असून महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा .असे आवाहन तालुकाप्रमुख बाबर यांनी केले आहे यावेळी महिला आरोग्य केंद्र कर्मचारी अशा कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.