जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिद्धेश्वर पॅनलचे पंढरपूरच्या वर्षा बरबडे व पंकज राठोड विजयी..
----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज) : नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिद्धेश्वर पॅनल मधून महसूल कर्मचारी संघटनेचे पंढरपूरचे वर्षाताई बरबडे पाटील व पंकज राठोड हे मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .
वर्षाताई बरबडे पाटील ह्या सध्या पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी, नेपतगाव या ठिकाणी तलाठी पदावर काम करीत असून पंकज राठोड हे मंगळवेढा येथील उपविभागीय (प्रांत कार्यालय) प्रभारी नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावीत आहेत दोघांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल पंढरपूर व मंगळवेढा उपविभाग कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले या निवडणुकीत महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सिद्धेश्वर पॅनलचे प्रमुख शतनु गायकवाड यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे.