कासेगाव मध्ये डेंगू चे थैमान.. १०ते १२ रुग्ण..
------------------------------------------------------------------------------------
तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल...
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : तालुक्यातील २६ हजार लोक संख्या असलेल्या कासेगाव मध्ये डेंगू रोगाचे १० ते १२ रुग्ण असून यावरती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून त्यांना माहिती विचारण्यासाठी फोन केला असता तसेच तालुका वैद्यकाय अधिकारी यांनाही फोन केला असता त्यांचाही फोन नॉट रिचेबल दाखवत असून गावातील नागरिकांनचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न सामान्य नागरिकां मधून उपस्थित केला जात आहे.
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे ड्युटीवर येताना सकाळी अकरा वाजता येतात आणि दुपारी बाराला घरी जातात १२ नंतर आलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यामार्फत सल्ले दिले जातात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कॉर्टर असून सुद्धा वैद्यकीय अधिकारी हे पंढरपूर येथे राहण्यास असल्याने संध्याकाळच्या रात्री च्या वेळी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने येणाऱ्या रुग्णांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ येते असून अगोदरच कोरोणाने हैराण झालेल्या सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने ते शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात परंतु त्या वेळी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैर हजर असल्याचे दिसून येते आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न जनसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यानां ऑन २४ तास ड्युटी असून सुद्धा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कासेगाव प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे संध्याकाळी मुक्कामी पंढरपूरला असल्यामुळे सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत असून गावातील डेंगू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत गैरहजर व कामात हलगर्जी पणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का याकडे कासेगाव व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.