सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती करण्याकरिताचा नकाशा तयार...
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील भीमा व मान नदीच्या तीरावर वसलेले सरकोली हे गाव पर्यटन स्थळ निर्मितीसाठी गेले कित्येक महिन्यापासून गावातील आभार वृद्ध व्यक्ती याकरिता अहोरात्र परिश्रम घेत आहेत सरकोली हे गाव पर्यटकांसाठी राज्याच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर येण्यासाठी सारागाव धडपडत आहे. याकरिता सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीचा नकाशा नुकताच गावचे सुपुत्र व वरिष्ठ अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी बाळासाहेब उर्फ बापूसाहेब भोसले यांनी व त्यांच्या टीमने येथील जुने गावाची मोजणी टीमद्वारे मोजून नकाशा तयार करून दिला आहे.
सर्वसाधारण या मोजणीचा ५० हजार रुपयेचा खर्च बापूसाहेब यांनी केला आहे .या नकाशा द्वारे पर्यटनातील सर्व वृक्ष, इमारती, शिल्प ,बगीच्या, कार्यालय, बोटिंग पॉईंट, घाट, रस्ते ,लोन ,इत्यादी निश्चित करण्यात येईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांना आपण प्रस्ताव देताना हा नकाशा जोडणार आहोत.या पुढीलही नकाशे स्वखर्चाने देतो असे आश्वासन दिले आहे. आज जत वरून मा.प्रभाकर भोसले सर आले होते. त्यांनी पर्यटन स्थळावर चाललेले काम पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी मागील वेळी ५००० हजार रुपयांची देणगी दिली आहे.
आज सर्वच मान्यवरांच्या हस्ते पर्यटन स्थळावर कै. श्रीरंग विठ्ठल भोसले व कै.वसुदेव नारायण भोसले यांच्या स्मरणार्थ दिलेले जांभूळ व सुपारीची रोपे लावण्यात आली. मातोश्री सुंदर सोपान शिल्पसंग्रहालय व टीचर्स गार्डन चे काम चालू आहे. सकाळी मंगळवेढा येथील दिपू नर्सरीचे श्री दिग्विजय राजपूत यांनी टीचर्स गार्डन व माण सनसेट पॉईंट ची पाहणी केली व पुढील कामाच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे कामकाज करीत आहोत. तसेच मूळ सरकोली गावातून बऱ्याच वर्षांपूर्वी बसवंतवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे स्थलांतरित झालेले श्री शिवाजी धोंडीबा भोसले सर व त्यांची सर्व कुटुंबातील व्यक्ती दर्शनासाठी आली होती.
सरकोली येथून बसवंतवाडी येथे स्थायिक झालेली कुटुंबाची संख्या १५ ते २० असल्याचे सांगितले ते नेहमी दर्शनासाठी येतात. आज त्यांनी १०००१/- रुपया पर्यटन स्थळास देणगी दिली .ते चैत्र अष्टमीस मोठी देणगी देणार असल्याचे सांगितले. तसेच सरकोली येथून ओझेवाडी येथे स्थायिक झालेले नागनाथ भोसले सर हेही दर्शनास आले होते ते ओझेवाडी भोसले ग्रुप तर्फे एखादी इमारत बांधकाम करून देतो असे आश्वासन दिले आहे.
आपण पर्यटन स्थळावर महागडी वृक्ष रोपे लागवड करीत आहोत. ही रोपे शेळ्या ,जनावरे खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आपण सर्वजण पर्यटन स्थळावर येत चला .श्रमदान करा, आपल्या प्रिय व्यक्तींच्या नावाने किंवा स्वतःचे नावाने आर्थिक मदत ,साहित्य, इमारत स्थळ, शिल्प, रोपे देवू शकता.