बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज ) : बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथमत: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच संविधानाचा जयघोष करण्यात आला.प्रमुख पाहुणे प्रा.शिवाजी काळे सर यांनी आपल्या मनोगतात,भारतीय संविधानाची निर्मिती,यामध्ये घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, संविधानाचे मानवी जीवनात महत्व व संविधानाचे बाबतीत प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य याचे सविस्तर विवेचन केले.यावेळी त्यांनी स्वलिखित "मराठवाड्याचा सुपूत्र" या पुस्तकाच्या दोन प्रती मान्यवरांचे शुभहस्ते ग्रंथालयास भेट स्वरुपात प्रदान केल्या.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहासबप्पा सुतार,सतीश पाचकुडवे,राहुल गडदे,प्रेम अग्रवाल,अक्षय पोकळे,कार्तिक चवरे आदी वाचक व सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व सुत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले तर आभार हनुमंत तुपे यांनी मानले.