विजयी उमेदवारां बरोबर पराभूत उमेदवारांचा ही केला शिवसेना तालुकाप्रमुखांनी सन्मान..!
---------------------------------------------------------------------------------
शिवसेना तालुकाप्रमुखाच्या नवीन उपक्रमामुळे तालुक्यातील सच्चा शिवसैनिकांना मिळाली ऊर्जा..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारांचा नुकताच त्यांच्या गावात जाऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे .गुरसाळे जि. प .गट विभागप्रमुख उमेशबापू काळे. विभागप्रमुख बाळासाहेब पवार समाधान व्यवहारे आदींनी त्यांचा सन्मान केला. तालुक्यातील खरातवाडी येथील विजयी उमेदवार व सरपंच आदींचा या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच होळे येथील पराभूत व विजयी उमेदवारांचाही सन्मान करण्यात आला.
त्यामुळे शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ व शिवसैनिक तसेच महिला भगिनी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.