शेडनेटकरीता कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सवलत मिळावी - आ. समाधान आवताडे

शेडनेटकरीता कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सवलत मिळावी - आ. समाधान आवताडे

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून वगळलेल्या शेडनेट शेतकऱ्यांना या योजनेतून कर्जमाफीचा लाभ द्यावा असा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे आ. समाधान आवताडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करत वगळलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समावेश करण्याची मागणी लावून धरली पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याने कमी पाण्यावर शेतीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट शेतीचा पर्याय निवडला त्यासाठी बँकेच्या माध्यमातून शेडनेट साठी कर्ज घेतले त्या कर्जासाठी सदरील जमिनीचे गहाणखत करण्यात आले. या शेतीतून उत्पादित मालाला अपेक्षित दर मिळाल्यामुळे हे शेतकरी बँकेकडून घेतलेले कर्ज भरू शकले नाहीत त्यामुळे हा कर्जाचा आकडा वाढत गेला परिणामी काही बँकांनी थकीत कर्जाच्या वसलीसाठी शेतकऱ्याविरोधात आक्रमक पावले उचलली.

दरम्यान शासनाने राबवलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत शेडनेट शेतीच्या कर्जाचा समावेश केले नसल्यामुळे हे शेतकरी या योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले या प्रश्नावर आ .समाधान आवताडे यांनी औचित्याच्या मुद्देद्वारे हा प्रश्न उपस्थित करत वगळलेल्या शेडनेट शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्याची मागणी केली त्यामध्ये तालुक्यातील ८० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या योजनेतून शेडनेट शेती केली.