बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये पीएचडी संशोधन अहवाल सादरीकरण

बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये पीएचडी संशोधन अहवाल सादरीकरण

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मान्यता प्राप्त पीएचडी संशोधन केंद्र आहे. हे संशोधन केंद्र शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयाचे आहे. मंगळवार दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पेट ७ व ८ प्रवेशित पीएचडी संशोधन विद्यार्थ्यांचे सहामाही प्रगती अहवाल सादरीकरण संशोधन सल्लागार समितीसमोर करण्यात आले. समितीचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस गोरे हे होते. यावेळी विद्यापीठ नामनिर्देशित विषय तज्ञ म्हणून डॉ .ए एम रंगरेज व डॉ .के जे शिंदे ( शिक्षणशास्त्र) तसेच प्रा. सिंकू कुमार सिंग व डॉ .विक्रम कुंतलवार (शारीरिक शिक्षणशास्त्र) उपस्थित होते. यावेळी संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ .व्ही पी शिखरे, डॉ .ए जी कांबळे, डॉ. एम एस डिसले, डॉ .आर ए फुरडे, डॉ. एम व्ही मते उपस्थित होते.

पीएच डी संशोधन विद्यार्थ्यांनी सहामाही प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी गत सहा महिन्यात संशोधन विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा संशोधन सल्लागार समिती समोर सादर करावा लागतो. यामध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण केले जाते व त्यावरून त्याला पुढील कार्यासाठी मान्यता दिली जाते. सादरीकरण झाल्यानंतर समितीने संशोधन विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना दिल्या. समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एस गोरे यांनी संशोधन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेळेत संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी संशोधन विद्यार्थ्यांनी क्षेत्र अभ्यास, भेटी, ग्रंथालय अभ्यास, संशोधन प्रकाशने, परिषद सहभाग आदी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

या सादरीकरणासाठी सर्व संशोधन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी डॉ .ए .जी कांबळे यांनी शारीरिक शिक्षणचे समन्वयक तर डॉ. एम .व्ही मते यांनी शिक्षणशास्त्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले.