यशवंतराव चव्हाण पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न:-

यशवंतराव चव्हाण पतसंस्थेची वार्षिक  सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न:-

--------------------------------------------------------------------------------
        दीपावली साठी सभासदांना 10% लाभांश वाटप..
--------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी ) यशवंतराव चव्हाण नागरिक सहकारी पतसंस्था मर्या. गुरसाळे या संस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या यशवंत सभागृहात संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल .कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील .वसंतदादा काळे. माजी चेअरमन नारायण दादा मोरे .यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यानंतर संस्थेचे मागील अहवाल सालात मयत झालेले सभासद संचालक यांना संचालक शंकर कवडे यांनी श्रद्धांजली चा ठराव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली .यानंतर संस्थेचे अध्यक्ष शहाजी  साळुंखे यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन करून उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले .यानंतर संस्थेचे चेअरमन साळुंखे म्हणाले की संस्थेने सामाजिक उपक्रमात भाग घेऊन केरळ येथील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून १ लाखाची मदत केली .

सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना ५०० साडी ५००टॉवेल याचे वाटप करून कोविडचे काळात गोरगरिबांना आर्थिक सहायता म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १लाखाची मदत केली असल्याचे सांगून आपले पतसंस्थेचे वार्षिक अहवालाचा आढावा घेताना मागील सालात एकूण ठेवी रुपये २२५८.४६  इतके लाख होत्या त्यामध्ये चालू वर्षे रुपये १३.९३ लाखाने वाढ होऊन त्यामध्ये 2272. वाढ झाली मागील वर्षी निधीची रक्कम ७८६ .६० लाख होती त्यामध्ये  संस्थेचेसभासद शेतकरी यांनी संस्थेवर विश्वास ठेवून आपल्या ठेवी ठेवून त्यामध्ये ८१४.१० लाख इतकी वाढ झाल्याचे सांगितले. संस्थेचे सभासद यांनी घेतलेले कर्ज वेळेत वेळेवर भरून संस्थेच्या नफ्यात वाढ करावी त्यावर घेतलेल्या कर्ज १ वर्षाचे आत भरणा झाल्यास सभासदांना  कर्जात १%सूट देण्याचे जाहीर करण्यात आले .तसेच संस्थेच्या सभासदांना दीपावली सणासाठी दहा१०% टक्के लाभांश वाटप करून ती रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सुनील देसाई यांनी सर्वसाधारण सभेचे नोटीस वरील विषयवार वाचन करण्यात आले .त्यास हजर सभासदांनी एकमताने सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली .

यावेळी प्रतिभा देवी पतसंस्थेचे चेअरमन माजी महादेव देठे .प्रतिभा देवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार .व्हाईस चेअरमन सादिक मुलाणी. वसंतराव काळे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शिंदे .दिनकर कदम .विठ्ठल चे संचालक धनंजय काळे .माजी संचालक तानाजी जाधव .कौठाळी चे सरपंच अनिल नागटिळक. मुंडेवाडी माजी सरपंच पांडुरंग मोरे .विठ्ठल चे माजी संचालक विलास भोसले .नारायण गायकवाड .शेतकरी संघटनेचे पोपट शिदे पळशीचे मा.सरपंच नंदकुमार बागल. तुंगचे माजी सरपंच राजाराम रणदिवे .खेड भाळवणी माजी सरपंच शहाजी पवार .अनंत घालमे उपसरपंच शरद पवार .बाबासाहेब करपे .संस्थेचे संचालक रणजीत पाटील .तानाजी मदने. भोसले महाराज. सुभाष कुंभार. महादेव शिखरे .रामचंद्र कोलगे. पोपट घालमे. उपसरपंच लक्ष्मण साळुंखे .इत्यादी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक बापूसाहेब दांडगे यांनी मानले.