*स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसिलवर मोर्चा...*

*स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसिलवर मोर्चा...*

पंढरपूर ( प्रतिनिधी):- स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आज पंढरपूर तहसिल कार्यालयावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाची सुरूवात शहरातील क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छञपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड मार्गे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसिल कार्यालयासमोर आला व त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूरचे नायब तहसिलदार श्रोत्री यांना दिले.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारक तात्काळ उभारण्यात यावे इंदू मिल येथील जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी न करता पूर्वीप्रमाणे करण्यात यावी गॅस पेट्रोल डिझेल व खाद्यतेल पदार्थाच्या किमती कमी करण्यात याव्यात शैक्षणिक साहित्य वर जीएसटी लावलेली मागे घेण्यात यावी. केंद्र सरकारने हॉस्पिटल दरपत्रक फलक न लावणारे बाबत काढलेला जीआर चे पालन करणारे डॉक्टर हॉस्पिटल यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्याच्या कमिटी स्थापन करून कारवाई केलेला अहवाल जाहीर करण्यात यावा. रेशन कार्डधारकांनी वरील जाचक अटी लागू केलेल्या रेशन कमी न देता पूर्वीप्रमाणे देण्यात यावे.

पंढरपूर शहरांमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नगरपरिषद प्रशासनाकडून फसवणूक केली जात आहे. व जातीय देशातून रमाई आवास योजनेचे धनादेश वितरित करत नाहीत व विविध अटी लावून योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंढरपूर शहरांमधील रमाई नगर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीमधीलस फ्लॅटचा ताबा तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावा या मागण्या या निवेदनाव्दारे देण्यात आल्या.

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे जिल्हा संघटक प्रताप कांबळे, तालुकाध्यक्ष वैभव वाघमारे शहर अध्यक्ष अक्षय वनसाले, महिला आघाडीच्या अध्यक्षा वनिता सरवदे, पूजा क्षीरसागर, अजित जगताप, सदाशिव मस्के, शरीफ शेख, प्रशांत राऊत, नितीन पाटोळे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.