कौठाळी ग्रामपंचायत च्या वतीने नागरिकांना मोफत धान्य दळून देण्याचा उपक्रम

कौठाळी ग्रामपंचायत च्या वतीने नागरिकांना मोफत धान्य दळून देण्याचा उपक्रम

________________________________________________

कौठाळी (प्रतिनिधी) : कौठाळी ता. पंढरपूर येथे गावातील सर्व नागरिकांना मोफत धान्य दळून देण्याकरिता ग्रामपंचायत च्या वतीने पीठगिरण सुरू करण्यात आली आहे. सदर उपक्रमास गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी नागटिळक यांनी गिरणी व इमारत उपलब्ध करून दिली या उपक्रमाचे उद्घाटन गावचे ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच हरिभाऊ पाटील , ईश्वरा धुमाळ,सहकार शिरोमणी चे संचालक मोहन नागटिळक,विठ्ठल सहकारी चे संचालक कालिदास पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेचा फायदा गावातील सर्व कुटुंबा सोबत गावात आलेले शेत मजूर, ऊसतोड कामगार यांना होणार आहे . सरपंच सौ.शारदा अनिल नागटिळक, उपसरपंच रामदास नागटिळक सर्व सदस्य व ग्रामसेवक श्री.कृष्णा नवले यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

यावेळी  मार्केट कमेटीचे संचालक रघुनाथ गोडसे, गावचे ज्येष्ठ वसंत नागटिळक, ग्रा. प सदस्य ॲड. दत्तात्रय पाटील,नरहरी नागटिळक ,तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन पाटिल, मा. सरपंच शंकर गोडसे, महादेव गाढवे, अनिल नागटिळक, पै. संदीप पाटील, ग्रा. प सदस्य धोंडीराम वाघमोडे, सोमनाथ लोखंडे, अरुण नागटिळक, स्वाभिमानीचे सचिन आटकळे , अरुण धुमाळ, नागनाथ नागटिळक, बाळासाहेब इनामदार, शंकर बनसोडे, सतीश नागटिळक, बाळू मुळे, तुकाराम वाघमारे,शंकर वाघमारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक मा. नवले यांनी मानले.