*राजाराम मोहन राय यांची जयंती महिला सक्षमीकरण दिवस म्हणून साजरी करावी- जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष कुमार जाधव.*
----------------------------------------------------------------------------------------
सोलापूर(प्रतिनिधी):- भारतातील पहिले थोर समाज सुधारक राजाराम मोहन राय यांनी महिला सक्षमीकरणासाठी जीवन समर्पित केल्याने त्यांची 250 वी जयंती 22 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील सर्व ग्रंथालय प्रमुखांनी महिला सक्षमीकरण दिवस म्हणून साजरी करण्याचे आव्हान सोलापूरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री संतोष कुमार जाधव यांनी केले. थोर समाज सुधारक राजा राम मोहन राय यांची 250 वी जयंती महिला सक्षमीकरण दिवस म्हणून साजरा करण्याचे शासनाचे धोरण ठरवलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष कुमार जाधव यांनी राजाराम मोहन राय यांच्या जयंतीचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील विद्यार्थ्यांची रॅलीचे नियोजन करण्यासाठी आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याचे ग्रंथालय अधिकारी जाधव यांनी सांगितले.
यावेळी संगीता कुमठेकर यांनी एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष कुमार जाधव यांनी त्यांचे स्वागत पर सत्कार करण्यात आला. यावेळी या नियोजन बैठकीला ग्रंथालय चळवळीचे कुंडलिक मोरे, संगीता कुमठेकर, प्रकाश मोरे, रमा एप्पल पल्ली ,ग्रंथालयातील तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील ,कनिष्ठ लिपिक प्रमोद गाडे, प्रकाश शिंदे ,तसेच शहरातील सर्व ग्रंथालय कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नियोजन बैठकीला उपस्थित होते.