शेतकऱ्यांसाठी गोड बातमी..! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज करा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी - बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन
-----------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहेअनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर 'रास्ता रोको' श्री. शंभरकर आणि शिंदे म्हणाले, की ही योजना ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडित झाली होती. तथापि, शासन निर्णयानुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणी नंतर मंजुरी देण्यात येणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत.