आजच्या महिलांनी उद्याचे शरदचंद्रजी पवार साहेब घडवावेत महिला प्रदेशाध्यक्ष :- विद्याताई चव्हाण
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज ) : परिस्थिती नसतानाही ११ मुलांना जन्म देऊन त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करून त्यांना योग्य शिक्षण देऊन व संस्काराची शिदोरी त्यांच्यासोबत ठेवून ज्या पद्धतीने शारदाबाई पवार यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा नेता घडवला असेच उद्याचे युवक व सुसंस्कारित पवार साहेबांसारखी युवक घडवावेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी केले.
अजित दादा पवार फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील कर्तुत्वान मातांचा शारदायी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे ,युती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा )पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील ,शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा सचिव प्रियदर्शनी ताई महाडिक, सुनिताई रोटे ,लता ताई फुटाणे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले ,नगरसेवक मोहम्मद उस्ताद, विधानसभा अध्यक्ष संदीप मांडवे आदी उपस्थित होते.
यावेळी रंजना आवटे, डॉ. मीनाक्षी कदम, श्रीमती गोपाबाई साबळे लोपमुद्रा पाटील,विद्या क्षीरसागर पाटील, कमल गाढवे,चांगुणा भोसले,पद्मिनी राऊत या मातांना शारदाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सिनेट सदस्य निवड झालेल्या शिक्षक यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रुपाली ताई ठोंबरे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणताई सलगर ,उमेश पाटील संदीप मांडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
सध्या सोशल मीडिया मुळे अनेक मुली फसल्या जातात अन चुकीचा रस्ता निवडतात त्यामुळे श्रद्धा सारखे प्रकार देशात घडतात म्हणून युवा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले त्यांचे मुलांनो आई वडिलांना समजून घ्या या विषयावर व्याख्यान देत असताना संपूर्ण सभागृहात अश्रू अनावर झालेल्या मुली हायमोकळून अश्रूंना वाट करून देत होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, नगरसेवक मोहम्मद उस्ताद ,सुरज पेंडल ,सुरज कांबळे, आकाश सिताफ ,विकी अभंगराव संतोष बंडगर ,दादा थिटे, कॉलेजचे प्रा. श्री मुळे इ.परिश्रम घेत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश गाजरे सर यांनी केले तर आभार यांनी मानले.