26 /11 शहीद जवान दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस संकुलनात रक्तदान शिबिराचे भरगच्च आयोजन 515 रक्तदात्यांचा सहभाग
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( पंढरी नगरी न्युज ) 30 नोव्हेंबर 2023 रोजी मंगळवेढा पोलीस ठाणे येथे 26/ 11 मधील शहीद जवानांना अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.सदरचे रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर , व सिद्धेश्वर ब्लड बँक. सोलापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेले होते.

सदरचे रक्तदान शिबीर सांगोला- मंगळवेढा उप विभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण 515 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा तालुका पोलिस निरीक्षक रणजीतसिंह माने यांनी व पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
