एस टी .बसच्या वेळेत बदल करून शालेय विद्यार्थ्यांनीची होणारी गैरसोय थांबवा , स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर आगार प्रमुखाकडे मागणी!

एस टी .बसच्या वेळेत  बदल करून शालेय  विद्यार्थ्यांनीची होणारी  गैरसोय थांबवा ,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर आगार प्रमुखाकडे मागणी!

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर आगारातून सुटणारी पंढरपूर ते शेळवे ला जाणारी बस पंढरपूर आगारातून दररोज सायंकाळी 4 वाजते सुटते,सदर बसने शिरढोण, कौठाळी, खेडभाळवणी,शेळवे ,व्होळे इ.दि .गावातील शालेय विद्यार्थी पंढरपूर येथे काॅलेज या बसमध्ये ये - जा करतात. परंतु काॅलेजच्या वेळापत्रकानुसार काॅलेज 4-15 मिनिटांनी सुटते आणि बस मात्र पंढरपूर आगारातून 4 वाजताच निघून जाते अशा वेळेला या गावातील सर्व शालेय विद्यार्थी कंडरे चौकात येऊन खाजगी वाहनाने प्रवास करतात, खाजगी वाहन ही भेटत नाही.

 
      
बस वेळेत न मिळाल्यामुळे चौकातील रोड रोमिओ त्यांना त्रास देतात  कधी कधी घरी यायला विद्यार्थ्यांना फार उशीर होतो, ही बाब लक्षात घेतासदर बसची वेळ बदलून 4 ऐवजी 5 वाजता बस सोडवी जेणेकरून शालेय विद्यार्थी दिवस मावळायच्या आत घरी सुखरूप पोहचतील.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर एसटी बस आगार प्रमुखाना देण्यात आले. 

यावेळी कौठाळी च्या सरपंच सौ. अनिता नागटिळक , विद्यार्थीनी कु. साक्षी मुळे, प्रतिक्षा मुळे, शितल भुई, चंदना सलमपुरे, विनिता नागटिळक, नम्रता नागटिळक, संध्या भोई, अरुण नागटिळक, आणासो टिंगरे, धीरज सपताळ, महादेव नागटिळक इ. ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.