मारापुर येथे दि. १३ रोजी रविवारपासून आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन ◼️ मंगळवेढा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील यांची माहिती
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै. पंढरी नगर न्यूज) मंगळवेढा तालुक्यातील जय मल्हार आट्यापाट्या संघातर्फे व ग्रामस्थ यांच्या वतीने रविवार दिनांक 13 रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा तालुका शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी दिली.
या आट्यापाट्या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर- माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते व, भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिलदादा सावंत, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत( नाना) देशमुख, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी गावकरे ,संत दामाजी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, माजी संचालक बळवंत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख येताळा भगत सर, संतोष रणदिवे, चंद्रशेखर कोंडूभैरी, संजय यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेसाठी विजेत्या संघास प्रथम बक्षीस म्हणून पंचवीस हजार 20 हजार, 15 हजार ,10 हजार ,5 हजार ,3 हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे, या स्पर्धा पार करण्यासाठी दगडू आसबे, दिनकर यादव, शिवाजी माने, अप्पा माने, कुमार पाटील काम पाहणार आहात मंगळवेढा पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील अट्याळपाट्या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी आनंद पाटील 99 70 32 56 34, बंडोपंत पाटील 98 90 43 75 86, तात्या सातपुते, उमेश आसबे, नितीन यादव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.