आमदार आवताडेसाहेब, मतदारसंघातील प्रश्नांबाबत अधिवेशन संपल्यावर बोलणार का..? - स्वाभिमानी युवाआघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांचा ,आमदार आवताडेंना खडा सवाल..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे, राज्यातील ज्या त्या मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत ज्या त्या लोकप्रतिनिधींकडून मांडले जात आहे.. मात्र याबाबत पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार .समाधान आवताडे मात्र मतदारसंघातील प्रश्नांबाबत अद्माप गप्पच पहायला मिळत आहेत,आता यावरच रणजित बागल यांनी आवताडे यांचेवर टिका केली आहे.
आमदार महोदय, तालुका व मतदारसंघातील अनेक मोठमोठे प्रश्न आ वासुन उभे आहेत. मात्र आमदार आवताडे आधिवेशनात विकासा याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत, पंढरपुरातील काॅरीडाॅरचा प्रश्न आहे, तसेच तालुक्याच्या एमआयडीसीचा ही विषय महत्त्वाचा आहे मात्र यावर आमदार महोदय विधानसभेत बोलण्याचे औदार्य दाखवत नाहीत, मतदारसंघातील प्रश्नांबाबत आमदार महोदय अधिवेशन संपल्यावर बोलणार का..? असा सवाल बागल यांनी उपस्थित केला आहे.
आज शहर व तालुक्यातील जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत इतर मतदारसंघातील आमदार त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत संपुर्ण विधानभवन डोक्यावर घेतात.. आवाज उठवतात प्रसंगी गोंधळ करतात परंतु प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करतात परंतु आमदार आवताडे मात्र याला अपवाद आहेत. मतदारसंघातील जनेतच्या प्रश्नांबाबत अधिवेशनाचा निम्म्याहुन अधिक कालावधी संपुनही एखादा तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधी देखील मांडायला आमदार अपयशी ठरले आहेत. हा एकप्रकारे तालुक्यातील जनतेचा अपेक्षाभंग आहे अशी खरमरीत टिका देखील बागल यांनी यावेळी केली आहे.