वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्या मातोश्री संस्था मतदारसंघातून विजयी सलामी..!
------------------------------------------------------------------------------------
अभिजित पाटील डाॅ. रोंगे यांच्या गटाला पुन्हा एकदा जोराचा धक्का , संस्था मतदारसंघातून मालन काळे बिनविरोध
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) : भाळवणी येथील वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातुन मालन वसंतराव काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सुरवातीलाच एक जागा बिनविरोध करून कल्याणराव काळे यांनी अभिजित पाटील यांच्या गटाला जोरदार धक्का दिला असून काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामंजूर केलेला उमेदवारी अर्ज मंजूर करण्यासाठी अभिजीत पाटील गटाने प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर यांच्याकडे केलेले अपील फेटाळत त्या आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर केले आहे. त्यामुळे पाटील गटाला निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जबर धक्का बसला आहे. या दोन धक्क्यामुळे विठ्ठल परिवारात उत्साहाचे वातावरण पसरले असून कार्यकर्ते मोठ्या हिमतीने मतदार सभासदांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसत आहे. कल्याणराव काळे यांनी अभिजीत पाटील यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून उपरी येथे सभासदांची विचार विनिमय बैठक घेण्यात आली होती .या सभेला सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.