राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. शरद पवार दि. ७. मे .रोजी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठलच्या गडावर येणार,

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. शरद पवार दि. ७. मे .रोजी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठलच्या गडावर  येणार,

---------------------------------------------------------------------------------
        आबांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारणार,
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) - भारत देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते श्री .विठ्ठल सह.साखर कारखाना येथील  कार्यस्थळावर बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३रोजी सकाळी ९ वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.

राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाची व शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी नियोजन केले आहे. त्यामुळे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. खा.शरद पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे असे अतूट नाते आहे श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत खा .शरद पवार यांचा मोठा सहभाग आहे .त्यांनी वेळोवेळी कारखान्यास मदतही केली आहे. अलीकडच्या काळात श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखाना दोन वर्षे बंद होता .तो सुरू करण्यासाठी कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजीत पाटील यांनाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि मदत केली आहे .शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती .याच पार्श्वभूमीवर ते प्रथमच कार्यक्रमासाठी पंढरपूरला येणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले .त्यांच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

खा .श्री.पवार साहेबांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली असता साहेबांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तमाम शेतकरी, सभासद, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांनी केले आहे.