पिक-अपने ठोकरल्याने इंजिनिअरींगच्या विदयार्थ्याचा मृत्यू..!

पिक-अपने ठोकरल्याने इंजिनिअरींगच्या विदयार्थ्याचा मृत्यू..!

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा(पंढरी नगरी न्यूज) ; मंगळवेढा-मरवडे मार्गावर  भरधाव वेगात राँग साईडने येवून पिक अपने मोटर सायकलस्वार तथा इंजिनिअरींग कॉलेजच्या विदयार्थ्यास जोराची धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी होवून मयत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात पिक अप चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत सुयश पांडुरंग माने (वय 22 रा. वडाची वाडी ता.मोहोळ) हा इंजिनिअरींग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात अकलूज येथे शिकत असून तो मरवडे येथील नातेवाईक प्रविण पवार यांच्याकडे  एम एच 13 डी.डब्ल्यू 7855 या युनिकॉर्न गाडीवरून दि.2 मे रोजी सकाळी 9.00 वा. जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ समोरून भरधाव वेगात येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या  पिक अपने राँग साईडने येवून युनिकॉर्न गाडीला जोराची धडक दिल्याने खाली पडून त्याच्या तोंडास,डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत होवून तो मयत झाला.याची फिर्याद रमेश भोसले रा.पापरी यांनी दिल्यावर पिक अप क्रमांक के ए 64,4135 च्या अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.