मा .वसंतराव ( नाना) देशमुख यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन...
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै. पंढरी नगरी न्यूज) : कासेगाव जिल्हा परिषद सदस्य तसेच तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन वसंतराव देशमुख यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक यांनी दिली .
कासेगांव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्या, कासेगाव तसेच मा. वसंत (नाना) देशमुख सार्वजनिक वाचनालय कासेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने कासेगांव सुपुत्र जिल्हा परिषद विद्यमान सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७/१/ २०२३रोजी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कासेगाव जिल्हा परिषद गट तसेच कासेगाव पंचायत समिती गटातील वसंत नाना देशमुख प्रेमी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरास सकाळी १ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे ठिकाण विकास सेवा सोसायटी या ठिकाणी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत नाना देशमुख सत्कार समिती यांच्यावतीने करण्यात येत आहे.