मराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी पुरस्काराचे वितरण:-

मराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी पुरस्काराचे वितरण:-

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी)/- मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव सर यांनी दिली.

मराठा समाजातील शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या मराठा समाज सेवा संघाच्या वतीने या पुरस्काराचे दरवर्षी आयोजन केले जाते' त्याप्रमाणे याही वर्षी दि.३० शुक्रवार रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था शेजारी व जुन्या एस टी बस स्थानकासमोर असलेल्या हॉटेल विठ्ठल इन येथे सायं. ६:०० वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष मात्यासाहेब पाटील हे भूषवणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सत्यवान भिंगारे यांची उपस्थिती लाभणार आहे.

पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचारी नावे पुढील प्रमाणे - सचिन दत्तात्रय वाघ- राज्य परिवहन महामंडळ (वाहक).अमोल सुरवसे- पोलीस नाईक पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन .शितल श्रीराम भोसले- आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव. गंगाधर माणिक कदम - आरोग्य सेवक तावशी .सुंदर उत्तम नागटिळक- कनिष्ठ सहाय्यक एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती पंढरपूर .जयश्री शहाजी शेनवे - आदर्श ग्रामसेविका ग्रामपंचायत शेगाव दुमाला. कैलास श्रीरंग भोसले- कृषी सहाय्यक कासेगाव .संतोष विष्णू खुणे- हेड पोस्ट मास्तर पंढरपूर. प्रशांत रवींद्र गायकवाड- शाखा अभियंता महावितरण कंपनी चळे. डॉ. विशाल बाहुबली खडे पंढरपूर. मुजमील खलील कमलीवाले - समाजसेवक पंढरपूर इत्यादी मान्यवरांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव सर यांनी केले आहे.