पुणे विभागीय आयुक्त कार्यालया समोर करणार आमरण उपोषण/-
#####################################
पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत मागील सहा महिन्यांपासून मोहोळ गटविकास अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद मुख्याधिकारी व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी व संबंधित तक्रारी सोबत ज्या माध्यामातुन या ग्रामपंचायतीचे बनावट पावती व शिक्का बनवून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
त्याचा पुरावा जोडलेला असूनही संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी वरील तिन्ही प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात नसल्याने नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने येत्या सोमवार १० ऑक्टोंबर रोजी पासून मला या प्रकरणात संबंधित भ्रष्टाचार करणारे लोकांवरती कारवाई किंवा शासणाचा कर रूपी पैशाची चोरी केलेल्या नागरीकांवर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणास बसणार असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे यांनी सांगितले.
#####################################