धायटीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी कदम हिचे; एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्वल यश
------------------------------------------------------------------------------------
सांगोला (पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या एन. एम.एम.एस. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सदर परीक्षेमध्ये श्रावणी कदम हिने १०५ गुण मिळवून मोठे यश संपादन केले आहे. ती छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी या प्रशालेची विद्यार्थीनी असून याच संस्थेतील १८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
इयत्ता आठवी आणि नववी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. यावर्षी छत्रपती शिवाजी विद्यामंदिर या प्रशालेने या परीक्षेवर आपला ठसा उमटवला असून श्रावणी राजू कदम हिने मोठे यश मिळवले आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवराज रामदास भोसले, माणिक भोसले तसेच मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांच्याकडून श्रावणी हिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
श्रावणी कदम हिच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांचे सहशिक्षक नामदेव हजारे, रामचंद्र वाघमोडे, विजयकुमार जगताप, सुनील लिगाडे यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल धायटी ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.