तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
______________________________________________
पंढरी- नगरी न्यूज : जवाहर नवोदय विद्यालयात एकतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिवस ३१ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षक वृंद उपस्थित होते . श्री एच. जी. जाधव यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली .त्यानंतर मा.अक्षय पवार या विद्यार्थ्याने सरदार पटेल यांच्या कार्यावरती आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर देखील भारतामध्ये एकतेचा संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी कसा दिला हे सांगून त्यांचे विचार कसे वास्तववादी होते सांगून विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्याकडे संघटन कौशल्य कसे होते यावरती आपले विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये एकतेचे महत्व या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सदर पटेल यांच्या जीवन चरित्रावर ती आधारित पुस्तक प्रदर्शनी भरविण्यात आली होती .नवोदय विद्यालय ते तुळजापूर बस स्थानक पर्यंत राष्ट्रीय एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाचे संचालन एच. जी. जाधव यांनी केले.