सरकोली पर्यटन स्थळ विकास निर्मितीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार - आमदार पाशाभाई पटेल

सरकोली पर्यटन स्थळ विकास निर्मितीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार - आमदार पाशाभाई पटेल

---------------------------------------------------------------------------------
बांबू पिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. आ.पाशाभाई पटेल यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मीतीस भेट..
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज) : गेली सात महिन्यापासून सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी संपूर्ण गाव एक दिलाने मदत करीत असून त्यात भरीस भर म्हणून महाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार पाशाभाई पटेल यांच्या कानावर माहिती गेल्याने त्यांनी वेळात वेळ काढून यांनी रयतक्रांती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिपक भोसले यांचे सोबत सरकोली येथे भेट दिली., पर्यटन स्थळाची पाहणी करते वेळी त्यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी काळे साहेब यांना फोन करून सांगितले की, सरकोली पर्यटन स्थळावर बिहारच्या पॅटर्ननुसार वृक्ष लागवडीस प्रस्ताव मंजूर करावा व पर्यटन स्थळावरील रस्ता एम आर इ जी. एस मध्ये मंजूर करावा असे सुचविले . पर्यटन स्थळाची झालेले कामे पाहून समाधान व्यक्त केले. व काही सुचना दिल्या. समाधान भोसले सरांच्या सुपारीच्या बागेस भेट दिली. सुपारी फळाची ,देशी सेंद्रिय केळीची,माहीती घेतली.

कोकण कन्या निवासस्थानी सदिच्छा भेट :

शेतकऱ्यांसाठी बांबू लागवडी संदर्भात माहिती सांगितली की, बांबूच्या एकंदरीत १६०० जाती आहेत. नवीन आलेली बांबूची जात ६० ते ७० फुट उंच जाते. या बांबू पासून दात घासण्यासाठी ब्रश, हातातील घड्याळ, पटा, फर्निचर, कापड, हेलीकॉप्टर, त्यास लागणारे तेल,कागद, चप्पल, इत्यादी घर साहित्यासह  इतर वस्तू बनवितात. हे बांबू जास्तीत जास्त  ऑक्सिजन निर्माण करतात.सध्या सोलापूर येथील लाईट बनविणारी N.T.P.C  कं. ८रू ५० पै. किलो दराने बांबू खरेदी घेत आहे.

जगात बांबू च्या वस्तूला चांगले मार्केट आहे.पर्यटक याची जास्तीत जास्त खरेदी करतील.पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी जास्तीत जास्त बांबूची घरे बनवा. हे पाझरपड जमीन मध्ये चांगले प्रकारे येते. नदी काठावर चांगले येते.  लागवडी शिवाय दुसरा खर्च नाही. लागवडी साठी एक हेक्टर क्षेत्रास केंद्र सरकारने ६ लाख रुपये अनुदान ठेवले आहे. याचे एक रोप ३५/-रू.मिळते ९/९ वर लागवड करावी लागते. साधारण ३ वर्षाने त्याची तोडणी करतात. कमी खर्च, व कमी मनुष्यबळ लागते, पिकास रोगराई नाही. तरी शेतकरी बांधवांनी याची लागवड करावी. मी थोड्या दिवसात  मार्गदर्शक पाठवून देतो.तो लागवडीसह, मार्केटची,बनविण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती सांगतील असे सांगितले. तसेच सरकोली येथील पर्यटन स्थळ विकासासाठी शासनाकडे भरघोस निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले या नवीन पिकासंदर्भात आता गावकऱ्यांना याची उस्तुकता लागली आहे.  यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.