*संगेवाडीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा खंडागळे बिनविरोध*
*प्रतापसिंह खंडागळे*:-
सांगोला, तालुका प्रतिनिधी : संगेवाडी (ता. सांगोला) येथील उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुराधा रवींद्र खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली.
येथील मागील उपसरपंच राजू हरी खंडागळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज सरपंच तथा अध्यासी अधिकारी नंदादेवी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार (ता. 7) रोजी निवडीची प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी अनुराधा खंडागळे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान होवाळ, राजू खंडागळे, धनंजय पवार, विजय भुसे, दिपाली, नष्टे, रेश्मा खंडागळे असे एकूण नऊ सदस्यांपैकी एकूण आठ सदस्य हजर होते. या निवडीवेळी बाळासाहेब खंडागळे, रावसाहेब ताठे, महादेव कदम, दामोदर वाघमारे, प्रभाकर पवार, आप्पासो खंडागळे, दीपक शिंदे, तानाजी ताटे, रामदास खंडागळे, आनंदा गंगथडे, चंद्रकांत खंडागळे, सुदर्शन खंडागळे, राजेंद्र खंडागळे, मनोज यादव, संजय खंडागळे, तानाजी पवार, निसार मुलाणी, संतोष पाटील, रणजित पवार, औदुंबर खंडागळे, मुरलीधर रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सचिव राजकुमार ताठे यांनी निवडीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी सरपंच नंदादेवी वाघमारे व नूतन उपसरपंच अनुराधा खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक दत्तात्रय खंडागळे यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य समाधान होवाळ यांनी मानले. उपसरपंच निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.