सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा.
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर च्या वतीने आज 23 एप्रिल रोजी ग्रंथालयात पुस्तकाचे प्रदर्शन आयोजीत करून जागतिक पुस्तकदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रंथालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले .या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले .यावेळी सोनटक्के यांनी ग्रंथ प्रदर्शनामुळे नवीन पुस्तक वाचकांच्या नजरेत येते तसेच ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होते वाचक वर्ग वाढतो वाचक वर्ग वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या प्रदर्शनास वाचकांकडून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळाला .यावेळी ग्रंथ प्रदर्शनास कार्यालयाचे प्रमोद पाटील, प्रदीप गाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास असंख्य वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.