*वृंदावन नगर गृह निर्माण प्रकल्प सोसायटी मध्ये सुख सोयींचा अभाव* -- *लक्ष्मी टाकळी येथील प्रकार*
पंढरपूर-(खास प्रतिनिधी) पंढरपूर शहराजवळील लक्ष्मी टाकळी येथील वृंदावन नगर गृह प्रकल्प मध्ये विकास कामाचा अभाव असून मुख्य प्रवर्तक यांचेकडून देण्यात येणाऱ्या सुख सोयींचा भोजवारा उडाल्यामुळे गृह प्रकल्प सोसायटीमध्ये असणाऱ्या नागरिकांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हे गाव हाकेच्या अंतरावर असून या गावांमध्ये पुणे येथील नामांकित कंपनी रॉयल रिले टर्स या बड्या एका बांधकाम व्यवसायिकाने सन 2012 मध्ये वृंदावन नगर प्रकल्प निर्माण सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाच्या जागेमध्ये शंभर इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी मिळवली आहे. या सोसायटीत राहणाऱ्या ग्राहकाकडून व बांधकाम व्यवसायिकांनी काही रक्कम घेतली असून त्यामध्ये 40 घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीत राहणाऱ्या ग्राहकांना अपुऱ्या सुख सोयी दिल्या असल्याने समोर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ग्रह प्रकल्प सोसायटीत पिण्याचे पाणी रस्ते दिवाबत्ती लहान बाळ गोपाळांना व वृद्धांना कोणत्याही प्रकारची कर्मणुकीसाठी बाग बगीच्या इत्यादी कोणत्याही अपुऱ्या गोष्टीची कमतरता आहे. वरील सर्व योजना प्रकल्पातील राहणाऱ्या नागरिकांना देणे गरजेचे असताना बांधकाम व्यवसायिक याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुख सुविधा अभावी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नागरिकांना या प्रकल्पात सुविधा नसल्याने निराश होऊन वृंदावन नगर प्रकल्प सोसायटीच्या विरोधात सोलापूर येथील नगररचना विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्यामुळे पंढरपुरातील बांधकाम व्यवसायिकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकल्प सोसायटीत पंढरपुरातील अनेक बिल्डर्स सहभागी असल्याचे निदर्शनास येत आहे.बांधकाम व्यवसायिकाने सोसायटी मधील पूर्ण बांधकाम केलेल्या इमारती मध्ये विद्युत मंडळ कडून अद्याप पर्यंत मीटर जोडणी केलेली नसून विद्युत मंडळाच्या पोल वरील तारेवर आकडे टाकून विद्युत कनेक्शन घेतले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्युत मंडळाची आर्थिक नुकसान होत असून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. या प्रकल्पात इमारतींच्या समोर प्रमुख बाजूस गेट नसल्याने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याचा फटका येतील घरमालकांना बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी बांधकाम व्यवसायिकाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. तरी बांधकाम व्यवसायिकांनी सात दिवसाच्या आत प्रकल्पातील असणाऱ्या सुख सुविधा पुरवण्यात याव्यात अन्यथा सैरभैर झालेले नागरिक गृह प्रकल्प सोसायटीच्या विरोधात पंढरपुरातील विविध संघटना आंदोलनात सहभागी राहणार असून आंदोलन तीव्र स्वरूपात करणार असल्याचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. माननीय प्रांत अधिकारी यांचे कार्यालय समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.