ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या पती विरुद्ध अखेर मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल ◼️ अखेर तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) ब्रम्हपुरी येथील रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला ग्रामपंचायत हॉटेलमध्ये काम करण्यास लावून तिचेशी वारंवार वाद घालून भांडण करून शारिरिक व मानसिक त्रास दिल्याने त्यास कंटाळून तीने आत्महत्या केल्याप्रकरणी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतल्याने रोहिणी हिला खरा न्याय मिळाला असून हिच तीला भावपूर्ण श्रध्दांजली असल्याच्या प्रतिक्रिया फालोअर्समधुन व्यक्त होत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.26 मे रोजी दुपारी 3.30 वा. ब्रम्हपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रिल स्टार रोहिणी पाराध्ये (वय 25 वर्षे) हिने हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सर्व सोशल मिडीयामधून आत्महत्या तीने का केली असावी याबाबत विचारणा होत होती. पोलिसांनी तपासासाठी सी.डी.आर.काढला.मात्र त्यामध्येही नेमके कारण निघाले नाही.मयत रोहिणी हिचा पती निलेश पाराध्ये हा मागील एक वर्षापासून तीला घरगुती कारणावरून व तीची इच्छा नसताना तीला हॉटेलमध्ये काम करण्यास लावून तीचेशी वारंवार वाद घालून भांडणे करत असते.तसेच तीला अधून मधून हाताने मारहाण करीत शारिरिक व मानसिक त्रास दिल्यानेच त्याला कंटाळून तीने टोकाचे पाऊल उचलत हॉटेलमधील राहते खोलीचा दरवाजा आतून बंद करून खोलीतील पत्र्याला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.याची फिर्याद मयत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण रा.अर्धनारी यांनी दिल्यावर निलेश पाराध्ये विरूध्द बी.एन.एस.108,115(2),352,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.