*सिताराम महाराज शुगरचे कारभारी शेतकऱ्यांच्या भेटीला:-*

*सिताराम महाराज शुगरचे कारभारी शेतकऱ्यांच्या भेटीला:-*

पंढरपूर,(प्रतिनिधी):-* पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना यंदा लवकरच सुरु करण्यात येणार असून कारखान्यातील लहान-मोठी संपूर्ण कामे चांगल्या पद्धतीने वेळेस पूर्ण केली असून  कारखान्याच्या यंत्रसामुग्री त अमलाग्र बदल केला आहे. येणाऱ्या चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यात येणार आहे. तरी या भागातील शेतकऱ्यांनी ऊसाचे गाळप करण्यासाठी जास्तीत- जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा .असे अव्हान धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले.


ते पंढरपूर तालुक्यातील तुंगत गटातील रोपळे व बाभूळगाव या गावातील भेटीदरम्यान शेतकऱ्यांची हितगुज करताना सांगितले. खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याची गाळप क्षमता 2500 मे.टन वरून 3500 पर्यंत वाढवली असून. कारखान्याची यंत्रणा ऊस गाळपासाठी सज्ज ठेवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आता उसाच्या बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. गेल्यावेळी हंगामात या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा  प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या आता  दूर झाल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी सिताराम महाराज साखर कारखान्याकडे घालून सहकार्य करावे. व आलेल्या ऊसास चांगला दर देणार असल्याचे शेतकऱ्यांच्या गावभेटीदरम्यान बोलताना सांगितले.गाळपास आलेल्या उसाची बिले  त्या भागातील बँकेत शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करून ते वेळेवर  देण्यात येतील असे सांगितले.

यावेळी कारखान्याचे  संचालक, महादेव देठे, सहकार शिरोमणीचे संचालक, दिनकर  कदम, देवानंद गुंड-पाटील, अविनाश  चव्हाण, धनश्री महीला पतसंस्थेचे मॅनेजर, रवि शिंदे, मुख्य शेतीअधिकारी पी.जी. शिंदे, सुरेश बापू भोसले, हणमंत गोडसे, रोपळे गावचे मा.उपसरपंच गणेश भोसले, महेश भोसले,अरुण गायकवाड, माधव कुलकर्णी, बाळासाहेब म भोसले, महादेव ब भोसले,बाळासाहेब आंद,शुभम वि भोसले,  बाभूळगावचे मा.सरपंच दशरथ बापू चव्हाण, गणेश दिलीप चव्हाण, अमोल कोरके,कुमार कोरके,उध्दव बापू चव्हाण, व गावातील सर्व शेतकरी बंधू ,वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.