धाराशिव साखर कारखाना लि.युनिट ४ सांगोला सहकारी साखर कारखान्याचा ८ रोजी बॉयलर अग्नि प्रदीपन व मोळीचा शुभारंभ..
सांगोला (प्रतिनिधी):- धाराशिव साखर कारखाना लि. युनिट ४ सांगोला सहकारी साखर कारखाना लि. वाकी शिवणे .या कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रम समारंभ शनिवार दि.८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी (बापू )पाटील, सोलापूर विधान परिषद मतदार संघाचे माजी आमदार दीपक (आबा )साळुंखे पाटील, सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर गुरसाळे .चेअरमन अभिजीत (आबा )पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोळी टाकण्याचा शुभारंभ कार्यक्रम होणार असून होम हवण पूजा सौ .सुरेखा श्री धनाजी ज्ञानेश्वर खरात यांच्या शुभहस्ते तर मोळी पूजन सौ.कलावती श्री तुकाराम नारायण कुरे यांच्या शुभहस्ते वाकी शिवणे येथील कारखाना कार्यस्थळावर होणार आहे .
तरी सांगोला पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी व सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील यांनी केले आहे.