उमरडच्या महिला मंडल अधिकारी यांना लाच घेताना अधिकाऱ्यांनी पकडले ; करमाळा तालुक्यातील प्रकार.

उमरडच्या महिला मंडल अधिकारी यांना लाच घेताना  अधिकाऱ्यांनी पकडले ; करमाळा तालुक्यातील प्रकार.

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर  ( पंढरी नगरी न्यूज) : वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरिता २५ हजाराची लाच मागून वीस हजार रुपये स्वीकारणाऱ्या महिला मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

श्रीमती शाहिदा युनुस काझी, वय ४२ वर्ष, व्यवसाय नोकरी, पद- मंडळ अधिकारी, नेमणूक उमरठ मंडळ, तहसिल कार्यालय करमाळा अंतर्गत जि. सोलापूर असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांनी वारस नोंदच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी कार्यालय उमरड येथे हरकती अर्ज सादर केला असून सदर अर्जावर सुनावणी करुन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरता यातील मंडळ अधिकारी श्रीमती शाहिदा काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे २५,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंति २०,००० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम अज रोजी जेऊर शहरामध्ये असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय उमरड येथे स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार पोना स्वामीराव जाधव, पोना अतुल घाडगे, पोकों सलिम मुल्ला, शाम सुरवसे सर्व नेम लाप्रवि, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.