सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी पी.जे सावंत यांची निवड... पंढरपूर ,मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांमध्ये निवडीचे स्वागत

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी पी.जे सावंत यांची निवड... पंढरपूर ,मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांमध्ये निवडीचे स्वागत

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) आज सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांची मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये विविध विषयावरती चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष म्हणून पी. जे. सावंत सर यांची  नेमणूक करण्यात आली व मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कै. प्रा .पी.बी पाटील सर (मारापूर )यांचे शरदचंद्र पवार विद्यालय जुनियर कॉलेज (शरदनगर) मल्लेवाडी ता.मंगळवेढा येथील आदर्श मुख्याध्यापक पंढरीनाथ माने सर यांचे संपादकपदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी पी .जे सावंत म्हणाले की ,जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न ,अडचणी प्रामुख्याने सोडवणार असल्याचे सांगितले. कार्याध्यक्षपदी निवड झालेले पी. जे सावंत सर हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाई.चेअरमन कै. गोरख( तात्या) ताड यांनी स्थापन केलेल्या पंढरपूर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय खरसोळी येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत . कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे फोनद्वारे अभिनंदन होत असून जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी नियंत्रक समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाषराव माने सर, सदस्य रंगसिद्ध दसाडे सर, आर. के रोडगीकर सर, तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. तानाजी माने सर, उपाध्यक्ष विश्रांत गायकवाड सर, महेश सरवदे सर,  पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार सर, सचिव बापूसाहेब नीळ सर, अमोल चव्हाण सर, प्रा. उत्तमराव कोकरे सर, लक्ष्मणराव चलगिरे सर, बी.जी. कुलकर्णी सर व दादासाहेब कोळी सर व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.