पंढरपुरातील अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी कडक पावले उचलणार : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.
_________________________________________________
पंढरपूर ;(प्रतिनिधी) :- पंढरपूर येथील भीमा नदीच्या पत्रातील अवैध्य वाळू उपशामुळे समाजात अशांतता निर्माण होत असल्यामुळे त्याचे गुन्हेगारीकरण रूपांतर होत असल्याचे दिसत असल्याने पंढरीतील वाळू माफिया यांना महसूल अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच रात्रंदिवस वाळू उपसा होत आहे.
या संदर्भात ज्या ठिकाणी अवैध्य वाळू उपसा होत असेल त्या ठिकाणच्या महसूल अधिकाऱ्यांसह तहसीलदारांनाही त्वरित निलंबित करण्यात चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या नामदार विकी पाटील यांनी मंगळवारी सकाळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.
यावेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर. आमदार राम सातपुते .सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक .जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर .मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी इत्यादी उपस्थित होते .चंद्रभागा नदीच्या पात्रातील चोरटी वाळू वाहतूक थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील यासंदर्भात तात्काळ गुन्हे दाखल केले जातील पंढरपुरातील वाळू चोरी संदर्भात ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे.
राज्यात विशेषतः पंढरपूर तालुक्यात वाळू माफियाने घातलेला धुमाकूळ वाढत चाललेली गुन्हेगारी चिंतेचा विषय बंदी आहे पंढरपूर तालुक्यात तर रात्रंदिवस वाळू उपसा होत आहे याला महसूल अधिकाऱ्याचाच आशीर्वाद असल्याने हा वाळू उपसा बिनधास्त सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारी मिडियामधील बातम्या यांना न मानता वाळू उपसा जोमाने सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी वारी माप मुरमाचा उपसा केला आहे .या संदर्भात ही तक्रारी होऊन अनेक बांधकाम कंपन्यांना कोट्यावधी रुपयाचे दंड करण्यात आले आहेत दंड करूनही अद्याप या दंडाची वसुली करण्यात आलेली नाही किंबहुना दंड आकारल्यानंतर पुन्हा त्याच बांधकाम कंपन्या मुरूम उपसा करत असल्याची पहावयास मिळत आहे. या सर्व गोष्टीबाबत न्यायालयात ही खटलेही प्रलंबित आहेत. प्रकरण न्यायालयात पोचेपर्यंत दम करणारी येथील महसुली यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरून निघाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच पंढरपूर दौरा केला आहे यावेळी त्यांनी सांगितले की राज्यात वाळू माफीयामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यास अटकाव करण्यासाठी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अवैध्य वाळू उपसा दिसेल त्या ठिकाणचा तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदारांना निलंबित करण्यात यावी असे आदेश देण्यात आले .पंढरपूर सारख्या तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमाने सुरू आहे ट्रक ट्रिपवर ट्रॅक्टर एवढ्यावर न थांबता गाढवामार्फत अवैध्य वाळू उपसा सुरू आहे.
या संदर्भात पंढरपूर शहर व तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दमदार वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत परंतु वाळूची मालमत्ता ही महसूल खात्याची असून त्याची जबाबदारी महसूल खात्याची असल्याने महसूल खाते मात्र चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया कडे दुर्लक्ष करून त्यांना एक प्रकारची पाठराखण करीत असल्याचे यावेळी स्पष्ट होत आहे. पंढरपूर तालुक्यात सतत अवैद्य वाळू व्यवसाय सुरू असल्याचे तालुका वासियांना अगदी माहिती आहे हा वाळू उपसा बंद करण्याची धाडस आजवर एकाही महसूल अधिकाऱ्यांनी दाखवले नाही दिवसा बंद ठेवून रात्री वाळू उपसा करणे कधी कधी दिवस-रात्र वाळू उपसा करणे असे प्रताप देखील वाळूमाफेचे आहेत मग पंढरपूर मधील जबाबदार महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर दाखवणार का असा प्रश्न येथील नागरिकांना पडू लागला आहे.
पंढरपूर तालुक्यातील असणाऱ्या भीमा नदीकाठी गावसजा मधील कर्मचारी हेच वाळू माफिया कडून मलिदा घेऊन तो वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे .यासंदर्भात अधून मधून मीडिया मधून बातम्या प्रसिद्ध होत आहेत.यासर्व गोष्टीची पालकमंत्री विखे - पाटील यांनी वाळू उपशाचे व्हिडिओ आपणास पाठवावेत असे आवाहन पंढरपूर मधील पत्रकारांना केली आहे.
या संदर्भात आता जिल्हाधिकारी महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना वाळू चोरी संदर्भात पाठीशी घालणार की निलंबनाची कारवाई करणार की पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले.