सविताताई क्रेडिट सोसायटी व तीर्थ दूध शीतकरण वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

सविताताई क्रेडिट सोसायटी व तीर्थ दूध शीतकरण वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) तीर्थ कृषी उद्योग समूह तीर्थनगर वाडीकुरोली यांचे वतीने सविताताई क्रेडीट सोसायटीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त व तीर्थ दूध शितकरण केंद्राच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष श्री.समाधान काळे व श्री.डॉ.नीरज शहा सर (MDबालरोगतज्ञ ) यांचे शुभहस्ते करण्यात आले .

रक्तदान शिबिरामध्ये एकूण 110 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात आपले योगदान दिले.सदर कार्यक्रमास रणजितसिंह शिंदे यांनीही भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने डॉ.सुधीर शिनगारे, डॉ.अनिल काळे, डॉ.राजाभाऊ देठे, डॉ.कमल किशोर काळे, डॉ.रणजीत काळे, डॉ.स्वप्नाली दुपडे - सरडे , डॉ.मयुरी दुपडे, डॉ.हर्षद सोनवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक भीमराव पासले तसेच संजय काळे ,राहुल काळे ,सोमनाथ काळे ,.महेश काळे .धनंजय काळे.सिद्धनाथ पासले ,व सविताबाई क्रेडिट सोसायटीचे सर्व संचालक यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल काळे ,बँक शाखा व्यवस्थापक सूत्रसंचालन अक्षय खर्चे व आभार प्रदर्शन डॉ.मयुरी दुपडे यांनी केले . कार्यक्रमास दोन्ही संस्थेचे सभासद कर्मचारी अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .