पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर शहर स्वच्छोत्सवाचे आयोजन ◼️ एक दिवस, एक तास ,सर्वजण एकत्र ही संकल्पना.. ◼️ 25 सप्टेंबर 2025 पासून सकाळी ८ वा .अभियानास प्रारंभ..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी शहर स्वच्छ -सुंदर करण्यासाठी स्वच्छोत्सव अभियान राबविण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने दि.17 .सप्टेंबर ते दि. 2 .ऑक्टोबर पर्यंत पंढरपूर शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत एक दिवस, एक तास ,एक साथ ही संकल्पना उराशी बाळगून पंढरपूर शहर स्वच्छतेसाठी श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे .तरी पंढरपूर शहरातील तमाम नागरिक, विविध सामाजिक संघटना, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी पंढरपूर शहर उत्सव मध्ये सामील होण्याकरता आपणही या श्रमदान अभियानात सर्वांनी मिळून सहभागी व्हावे आणि आपला परिसर शहर, देश स्वच्छ सुंदर करण्याला हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. स्वच्छता करण्याची ठिकाण -- ,चंद्रभागा बसस्थानक, दत्तघाट नदीत ,यमाई तलाव ट्रॅक, के .बी. पी कॉलेज, उमा महाविद्यालय, कर्मयोगी निकेतन ,लोकमान्य प्रशाला ,आपटे उपलब्ध प्रशाला ,कवठेकर प्रशाला ,रुक्मिणी प्रशाला, मातोश्री विद्यालय ,सखुबाई कन्या प्रशाला इ. विविध ठिकाणी स्वच्छतेचे मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन सामूहिक उत्सवात करण्यात येणार आहे. तरी शहरातील तमाम लहान थोर नागरिकांनी एक दिवस, एक तास, एक साथ, स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले.